१. निळंशार संथ पाणी
सारं काही सामावून घेणारं ...
त्यात सचैल न्हाऊन आता युगं लोटली आहेत
मी पुन्हा एकदा कोरडीच
नवीन मन्वंतराची वाट पाहत !
२. भवताली जितकी माणसं तितके त्यांचे शब्द
तितकाच गडद होत जाणारा कल्लोळही ....
कंठाशी येत असणारं काही नकळत दडपू पाहणारा
त्यातून वाट काढत तळातून शब्द बाहेर येतात
तेव्हाच झालेलं असतं खरं शांतवन !