Friday, July 03, 2009

पाऊस आणि उगाच काहीतरी

सकाळपासून पाऊस लागलाय. काम करताना राहून राहून खिडकीबाहेर लक्ष जातंय. नजर हटत नाही इतका सुंदर पाऊस. घरी आल्यावर तर खिडकीशीच चिकटून बसलेय.भारतातला पाऊस छान असतो पण इथला पाऊस काही वेगळाच आहे. भारतातला पाऊस एकटा येत नाही. तो बरोबर चिखल, राडा, डबकी,वेगवेगळे वास,ट्रॅफिक जॅम ,खूप सारे हॉर्नचे आवाज अणि पावसाळी सहली घेऊन येतो. इथला पाऊस एकटाच येतो. लांबचलांब रिकामा रस्ता अणि त्यावर सावकाश पडणारा पाऊस पाहिलाय कधी? भारतातला पाऊस तुमच्या खोड्या काढतोय असं वाटतं. इथला पाऊस शांतपणे सोबत करतो. एखादा दिवस office ला जायला म्हणून निघावं आणि अशी मस्त हवा बघून मधेच उतरून इथल्या अप्रतिम नागमोडी रस्त्यांवरून ह्या पावसाबरोबर निरुद्देश भटकत रहावं.


खिडकीतून बाहेर बघताना एकदम हलकं हलकं वाटतंय. आत्ता इथे फक्त मी आणि सोबतीला पाऊस , बाकी सगळी व्यवधानं , सगळी नाती, त्यातल्या आशा, अपेक्षा ,चिंता,त्यातले गुंते काहीही माझ्यापर्यंत पोचतंच नाहीये. हा या पावसाच्या सोबतीचा परिणाम का एकटेपणाचा ? दृष्टिआड सृष्टी असली की मन किती विनापाश होऊ शकतं. हजारो मैल दूर असलेल्या जवळच्या माणसानी आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर सोडून देणं जमतंय की आपल्याला. मग एरवी नात्यातल्या अपेक्षा , इच्छा , अपेक्षाभंग असल्या खो-खो मधे का रमतो आपण?

नाती इथल्या पावसासारखी का नसतात?

10 comments:

Amol Sande alies Andy said...

oh Madam,
Hindustanatla paus tumhala asa watat asel, aamchya drushtine to shetkaryansathi aasha aanto, hirvegar ranwata aanto, pavsat ithlya matila alagach was asto.
mi pan pardeshat firlo aahe, pan Hinduustanatlya pavsachi kalpana tumhi disrya desha sobat karuch shakat nahi...
Aapla desh ha shevti aapla asto..
ithlya kichad madhe pai takaila pan aamhala maja watte....

अनिकेत said...

भारतातला पाऊस अजुनही काही आणतो बरं का:

१. मातीचा मस्त सुगंध
२. डबक्यात आणि चिखलातील पाण्यात कागदाच्या बोटी सोडण्याचा आनंद
३. प्रियकर-प्रेयसीला दुचाकीवर बसवुन पावसात भिजत, बेभान होत हॉर्न वाजवत फिरण्यातला आनंद
४. गल्ली-कोपरा, डोंगर, तळी, समुद्रापाशी भिजत मक्याची कणसं खाण्याचा आनंद
५. एकांत तर नेहमीच असतो.. गर्दी गोंगाटात "ये रे येरे पावसा म्हणत रस्त्यावर नाचण्याचा आनंद"
६. शेतामध्ये हिरवा-पाचु उगवणार, घरात पैसा येणार या आशेचा आनंद
७. बेभान, बेधुंद झालेल्या समुद्राच्या लाटांचे रुप पहाण्याचा, त्याचे तुशार आंगावर घेण्याचा आनंद
८. ऑफीस सुटल्यावरच नेमक्या येणाऱ्या पावसाला नावं ठेवत घरी आल्यावर, बायकोने दिलेल्या कपड्याने पटकनं डोकं पुसुन, कपडे बदलुन भजी आणि कॉफी पित, खिडकीतुन बाहेर कोसळणाऱ्या पावसाला बघण्याचा आनंद
९. फारंच पाऊस आहे बाबा म्हणुन कधी कधी अचानक ऑफीसला दांडी मारुन, आणि पोराला शाळेला सुट्टी देउन घरी एकत्र धम्माल करण्यातला आनंद
१०. उन्हाच्या लाहीने त्रासलेल्या धरतीला, शरीराला आणि आत्म्याला मिळणारा आनंद
११. धुक्यात हरवलेली वाट शोधत गिर्यारोहण करण्यातला आनंद
१२. डबक्यापाशी बेडकांचे डराव डराव, कोकीळीचे गायन, मोरांचा पिसारा फुलवुन केलेला डौलदार नाच, सह्याद्रीच्या पाठारावर उगवेलेली अनेक मनमोह्क रंगाची आणि सुवासाची फुले पाहुन झालेला आनंद
१३. गाडीच्या काचेवर साठलेल्या धुक्यावर बोटांच्या रेश्यांनी बनवेल्या चित्रांचा आनंद
१४. नविन रेनकोट खरेदीचा आनंद
१५. पावसावर मन-फुलुन निर्माण झालेल्या उभरत्या कविंच्या कविता लिखानातला आणि त्या वाचनातला आनंद
१६. उचंच उंच पर्वतावरुन कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यातला आनंद
१७. या पावसाचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी कधीही, कुठेही, कसेही, केव्हाही फिरण्यात असणाऱ्या स्वातंत्र्यातील आनंद

कित्ती सांगु हो तुम्हाला या भारताच्या पावसातील आनंद..

आश्लेषा said...

@amol- मी असं कधी म्हटलं की भारतातला पाऊस मला आवडत नाही? पण म्हणून इथला पाऊस आवडू नये असं थोडंच आहे? मी भारतातली कायमची रहिवासी आहे, आणि इथे थोडया दिवसांसाठी आहे.इथल्या पावसाचं वेगळेपण जे मला वाटलं ते सांगितलं.माझ्या मनातले विचार आणि पाऊस याची सांगड घातली आहे एवढंच..

@अनिकेत, agreed

Major Amol said...

Hi,

mala tumhala hurt karaiche navhte,
an mi tumchya ya wakyashi sahmat aahe ki dusrikadcha paus pan aawdu shakto mhanun.
Nisarg ha kuthe pan gela tari sarkhach asto.
Tumchya aaplya pausa baddalchya warnanamule mi thoda sensitive jhalo, karan kuni pardeshat rahnari marathi mule je ajun bhartat aali nahi tyanche he wachun aplya mati baddalche mat thode wegle banel hi kalpana karun thode wait watle...

Nivedita said...

Hi Ashlesha,
I didn't know you have a blog.. मस्त आहे तुझी लेखन शैली! Keep up the good work!

आश्लेषा said...

Thanks Nivedita :)

Dr. Prasad said...

तुझा पाऊस वाचला अन मलाही एक मस्त ललित सुचल खुप वर्शानि लिहिल आज thanks for my motivation आश्लेशा मला blog लिहिता यायला लागला की लिहील मग कधीँ एखाद्याच लेखन खरच खुप बदल घडवुन आणु शकत आयुश्यात धन्यवाद.

Anonymous said...

Sha potphodya samajun ghene. Sorry tech. Prob.

आश्लेषा said...

thanks dr.prasad for your generous comment :)

इंद्रधनू said...

दृष्टिआड सृष्टी असली की मन किती विनापाश होऊ शकतं. + 1