The Japanese Wife बघितला आणि एकदम आठवला तो 'बयो' . तेच निरपेक्ष प्रेम, एकमेकांसाठी जगाच्या अंतापर्यंत वाट बघायची तीच ती तगमग, एकाने दुसऱ्याचा घेतलेला अखंड ध्यास आणि दुर्दैवी अखेर.
एकीकडे उधाणलेला समुद्र आणि जीवघेणं सूफी संगीत तर दुसरीकडे पिसाळलेली 'मातली' नदी आणि वेडावाकडा कोसळणारा पाऊस.
लंडनला गेलेल्या विश्वनाथाचं उत्तर आलं नाही तरीही सतत पाच वर्षे चिकाटीने पत्र पाठवत रहाणारी बयो आणि केवळ पत्रांमधून एकमेकांना भेटलेले आणि लग्न करून सतरा वर्षे पत्रांमधूनच सहजीवन अनुभवलेले स्नेहमोय आणि मियागे.
पाच वर्षे विश्वनाथाच्या उत्तराची वाट पाहिल्यानंतर आणि पैसे साठवल्यानंतर थेट लंडनला जायला निघणारी कोकणातली बयो आणि जपानमधल्या मियागेला कॅन्सर झाला म्हणून तिच्या उपचारासाठी कलकत्त्यातल्या डॉक्टर आणि वैद्य लोकांचे उंबरठे झिजवणारा स्नेहमोय..
"तू कोकणातली मुलगी,लंडनला वगैरे जाण्याचं खूळ कशाला घेऊन बसलीयेस?" असं विचारल्यावर बयो "मग,पाच वर्षे झाली, विश्वनाथाचं काही उत्तर नाही,काय झालंय ,काही अड़चण आहे का,जाऊन बघायला नको?" असं अतिशय सहजतेने उत्तर देते.कुठेही विश्वनाथाने आपल्याला सोडलं तर नाही ना अशी शंका नाही, अविश्वास नाही. इतकं शुद्ध प्रेम बघून खरंतर अस्वस्थ व्हायला होतं. कॅन्सरवर जपानमधे भारतापेक्षा जास्त नीट उपचार होऊ शकतील हे माहीत असूनही ,परवडत नसताना कुठल्यातरी वैद्याने दिलेले काढ़े मियागेला पाठवणारया स्नेहमोयची जातकुळी नि:संदेह प्रेमाचीच .
बयो पाहिला तेव्हा प्रचंड आवडला होता.खूप intense सिनेमा आहे .मी परत नाही बघू शकणार.The Japanese Wife तसा विशेष आवडला नाही. पण कोणताही आव न आणता स्वतःच्या प्रेमावर गाढ़ विश्वास ठेवणारे ,मीपण ,पैसा ,प्रतिष्ठा ,कष्ट यांची पर्वा करण्याच्या पलिकडे गेलेले स्नेहमोय,मियागे आणि बयो यांचं कुठेतरी नातं आहे असं वाटत रहातं.

6 comments:
अगदी सहमत. बयो पाहिला तेव्हा असाच अंगावर आला होता. पुन्हा नाही बघू शकणार !! :(
या पोस्टमधे वाचुन आता बयो पहायची जाम ईच्छा झाली आहे. पण शेवट सुखंत आहे की दु:खांत?
@सोनाली, दु:खांत .. खूप वाईट आहे. कसंतरीच होतं :( !!!
@सोनाली,पण तरीही जरूर बघ ...
हि पोस्ट वाचून बघावासा वाटतोय बयो!
Nice Writing :)
Thanks nisha :-)
Post a Comment