Friday, October 08, 2010

एट, सेव्हन ,सिक्स ,फाईव्ह ...

आधीच ५ मिनिटं उशीर झाला होता.एरोबिक्स हॉल मधे बाहेरूनच डोकावून बघितलं तर बॅच सुरू झाली होती. ("श्या !! नेमका आजच उशीर झाला तर बॅच वेळेवर सुरू झाली.त्यातून ही ताडमाड उंच instructor जराही उशीर खपवून घेत नाही. जावं का बाहेरच्या बाहेर? खाली जाऊन gym करूया आज. नाहीतर जाऊदे , होईल ते होईल .करू एरोबिक्सच !")

"एट, सेव्हन , सिक्स , फाईव्ह ... latecomers please warm yourself up! we are already warmed up!" ("अरे वा !! आज एवढ्यावरच ?एरवी उशीर झाला तर आत घेत नाही")

"अजून वर घे तो पाय.you are only dancing.त्याचा काही उपयोग नाही ...("dancing???? भारी!! :P ")"

"why are you taking a breather between two steps? it looks like an elephant !do it in one go!" ("कसं शक्य आहे? मधे एक tap घेतला नाही तर पडीन मी......पण elephant??? ....ohh not bad !! जमतंय की थोडं थोडं ...")

"आज मी side bending घेणार आहे सगळं.एकेकाचे मस्त tyre आहेत ते जरा कमी करुया."("हिने रोज येऊन एवढं छळलं तर नक्कीच कमी होतील!")

"वाका जरा सगळे अजून.very good. you are doing it well." ("वा!! हिच्याकडून very good वगैरे ..नक्कीच चांगलं जमतंय!")

"एट, सेव्हन ,सिक्स ,फाईव्ह ,फोर, थ्री ,टू,वन ("हुश्श संपलं !!!") and give me one more set एट, सेवन ,..("अरे देवा!! मारणार आहे आज ही! मगाशीच बाहेरच्या बाहेर कटायला हवं होतं का?" )

"very good batch ..आता squats करूयात , मग थोड़े abs आणि stretches" ("finally!! उड्या मारणं संपलं ..abs, stretches आणि squats ठीक आहे. ते जमतं आणि करताना भारी पण वाटतं")

"now relax for a while. put one side of your face on your palms and close your eyes."

मी पालथ्या हातावर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून घेतले. एवढा सगळा दंगा घालून आता पडल्यावर एकदम निवल्यासारखं वाटत होतं. ते निवलेपण हळू हळू संपूर्ण शरीरात झिरपत जाताना जाणवत होतं. जणू काही माझ्या शरीराचा आणि मनाचा एकमेकांशी संवाद चालू होता.state of complete bliss!!!

आणि त्याच state of bliss मधे मला हे लिहावंसं वाटलं ! :-)

4 comments:

Anonymous said...

Liked only last para, adhichya bhagat tempo vadhvala asta tar climax fit basala asta,mi ultya kramane posts vachatoy,layamagna avastheche aprropra hi common thread janvatey,thick ahe tar blogchi suruvat ashi hoti tar,nice improvement afterwards

आश्लेषा said...

@Anonymous- Thanks! evadhe sagaLe vachun comment dilya baddal.

मच्छिंद्र माळी औरंगाबाद . said...

|| राम कृष्ण हरी ||

"जगद्गुरु संत तुकोबाराय चरण नमोस्तु"
****************************
आधी काळी जन बहु ऊचापती |
परि मढे हाती न लागती ||१||
मनी द्वेषभावे दावोनिया प्रित |
सांगती न हित मित्र काही ||२||
कोणा एका घरी जमे गाव मेळ |
आता नाही वेळ सांगोनिया ||३||
संदीप व्हावा बदल तो भला |
त्याजुनिया कला हरी धरा ||४||

(समाजात दिवसें दिवस खुप बदल होत चालला आहे,, माणुस स्वार्थात गुंतत चालला आहे)
पुर्वी लोकांना ऊचापती करायची सवय होती, पण आता मात्र शेजारच्या घरात कोणी मेले तरी कळत नाही,,,||१||
काही लोकं द्वेषाने का होईना,, पण हिताचे बोलत होते.
आता मात्र मित्रता आसुनही हिताचे बोलत नाही. ||२||
गावात कोणाची पुजा आसली तर बिना आमंत्रनाने संपुर्ण गाव यायचा आता मात्र आमंत्रण देऊन सुध्दा येत नाही. ||३||
बदल होणे हे काळाची गरज आहे हे जरी खरे आसले श्रीहरीच्या भक्तीत बदल करु नका म्हणजे झालं
****************************
रचनाकार:- श्री संदिपजी पांडव
प्रस्तुत कर्ता :मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

मच्छिंद्र माळी औरंगाबाद . said...

सुंदर रचना!